अघोरी पंथ : शैव संप्रदायातील एक पंथ
अघोरी पंथ : शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही नावे आढळतात. अथर्ववेदात व यजुर्वेदात शिवाच्या अघोर तनूचे उल्लेख आहेत. ‘अघोरीश्वर’ या नावाने शिवाची उपासना म्हैसूर व इतर भागांतही केली जाते. यावरून प्रस्तूत पंथाचा संबंध शैव संप्रदायातील पाशुपत व कालमुख या पंथांशी जोडला जातो. तसेच त्याच्या काही सिद्धांतांचा संबंध नाथपंशी जोडला जातो. तसेच त्याच्या काही सिद्धांतांचा संबंध नाथपंथाशी व तंत्रमार्गाशी जोडण्यात येतो. पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते. यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे लोक राहत. काही लोक झाडांच्या साली किंवा पाने, तर काही व्याघ्रचर्म नेसत. चामुंडा ही त्यांची देवता असून ते तिला नरबली देत. प्रेताचे मांसही ते खात. आनंदगिरीनेही शांकरदिग्विजयात त्यांचे असेच वर्णन केलेले आहे. घोड्याचे मांस वर्ज्य करून इतर सर्व प्रकारचे मांस ते खात. स्वत:चे मलमूत्रही ते अन्नात मिसळून खात. त्यामुळे अदभुत सामर्थ्य प्राप्त होते अशी त्यांची धारणा ...